शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी लंडनला पोहोचला. यासाठी भारतीय खेळाडू सरावाला सुरुवात करणार आहेत. याआधी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा लूक बदलला आहे. आता ही जर्सी अधिक आकर्षक दिसणार आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा पुढील टप्प्यासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघात ही पहिली टेस्ट सिरीज असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता टीम इंडियाची कमान शुभमन गिलच्या हातात आहे. ऋषभ पंत उपकर्णधार आहे. जसप्रित बुमराह स्क्वाडमध्ये आहे. पण तो मालिकेत एकही सामना खेळणार नाही.
टीम इंडियाच्या जर्सीचा लूक व्हायरल
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ नव्या जर्सीत सराव करताना दिसणार आहे. रवींद्र जडेजाने नव्या जर्सीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत जडेजाच्या अंगात निळ्या रंगाची जर्सी दिसत आहे. परंतु, आधीच्या जर्सीच्या तुलनेत आताची जर्सीचा रंग थोडा गडद आहे.
खालच्या बाजूला हलका जांभळा रंगाचे मिश्रण लूक आणखी स्टायलिश करतात. दंडावर तीन पट्ट्या आहेत. आधीच्या जर्सीवरही या पट्ट्या होत्या. दोन्ही संघात पहिला कसोटी सामना येत्या 20 जूनपासून हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजल्यापासून सुरू होणार आहे.
टीम इंडिया टेस्ट स्क्वॉड
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रित बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, सिराज, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
इंग्लंड टेस्ट स्क्वॉड
बेन स्टोक्स, शोएब बशीर, जेकब बॅथल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवरटन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स.
Leave a Reply