मॅनेजर बॉयफ्रेंड, HR बायको… लव्ह ट्रँगलमध्ये बिचाऱ्या राजाचा जीव गेला, नवा धक्कादायक खुलासा!

अवघ्या काही दिवसांपूर्वी सात फेरे घेऊन हनिमूनसाठी निघालेलं नवविवाहित जोडपं राजा आणि सोनम रघुवंशी… पण हा हनीमूनच राजासाठी मृत्यूचा कट ठरला. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. सोनमच्या अफेअरचं गूढ उलगडत असून, तिचा बॉयफ्रेंड तिच्याच वडिलांच्या फॅक्टरीत मॅनेजर होता, तर ती HR म्हणून काम करत होती.

शिलॉन्गला जबरदस्तीने नेलं :
राजा रघुवंशीला काश्मीरला जायचं होतं, पण सोनमने हट्टाने त्याला मेघालयच्या शिलॉन्गला नेलं. एवढंच नाही, तर सोनमने एकतर्फी फक्त जाण्याचं तिकीट बुक केलं होतं, परतीचं तिकीट बुकच नव्हतं. पोलिसांच्या मते, हा पूर्वनियोजित कटच होता.

2 जून रोजी शिलॉन्गच्या जंगलात राजाचा मृतदेह सापडला आणि 17 दिवस बेपत्ता असलेली सोनम अखेर गाझीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्यात सरेंडर झाली. तिच्याविरुद्ध इंदूर आणि मेघालय पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला आहे.

राज कुशवाह – अफेअरमधील मास्टरमाइंड :
सोनम रघुवंशीचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे. तो सोनमच्या वडिलांच्या मालकीच्या फॅक्टरीत मॅनेजर होता. सोनम HR म्हणून तिथे काम करत होती. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे राजला ट्रेस केलं आणि अटक केली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये विक्की ठाकूर, आनंद आणि राज कुशवाह यांचा समावेश आहे. पहिला हल्ला आनंदने केला आणि मग अन्य दोघांनी गुन्हा पूर्ण केला. तिसरा आरोपी आनंदला मेघालय पोलिसांनी मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतलं.

अजूनही काहीजण रडारवर – तपास अधिक खोलात :
पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन डिटेल्सच्या आधारे तपास सुरू ठेवला असून अजूनही काही लोक गुन्ह्यात सामील असण्याचा संशय आहे. पुढील अटकांची शक्यता आहे.

सोनमचे वडील सांगतात की, घटना घडण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत राज कुशवाह नियमितपणे फॅक्टरीत येत होता. या घटनेमुळे त्यांनाही जबर धक्का बसला आहे.

राजा रघुवंशी हत्या प्रकरण लव्ह, विश्वासघात आणि कटाचे थरकाप उडवणारे जाळं समोर आणत आहे. आता चौकशी पूर्ण होईपर्यंत सत्य समोर येणार नाही, पण सुरुवातीच्या पुराव्यांवरून हे प्रेमसंबंध प्राणघातक ठरल्याचं स्पष्ट होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *