मध्य रेल्वेवरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघात घडला. या अपघातात धावत्या ट्रेनमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली. या दोन्ही गाड्यांच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घासाघीस झाली, ज्यामुळे काही प्रवासी ट्रॅकवर कोसळले. या प्रकरणानंतर आता रेल्वे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच आता शरद पवार यांनी (Sharad Pawar On Mumbai Local Accident) या अपघातावर पोस्ट केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, काही प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो, असं शरद पवार म्हणाले.
Leave a Reply