नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ‘महादेवी हतीण’ प्रकरणी आज (२८ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाकडे मतांतर्गत येणाऱ्या तब्बल ८६५ गावांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हतीणीला स्थलांतरित करण्याच्या हालचाली काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या. या अंतर्गत हतीणीला नेण्यासाठी जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक दाखल झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे ही प्रक्रिया अद्याप अंमलात आणता आलेली नाही.
या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होत असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. यामध्ये हत्तीणीचे भवितव्य, स्थानिक जनतेची भावना आणि न्यायालयाचा निर्णय या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
‘महादेवी हतीण’ प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी; ८६५ गावांचे लागले लक्ष..

Leave a Reply