गगनबावडा – गगनबावडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू असून रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. घाटातील रस्त्यावर दरडीचा मोठा भाग आल्यामुळे वाहतूक दोन तासांसाठी ठप्प झाली होती.
ही घटना अचानक घडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरड कोसळल्याचे लक्षात येताच प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केले. अवघ्या दोन तासांत मार्ग स्वच्छ करून वाहतुकीस पुन्हा मोकळा करण्यात आले.
करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहनांच्या रंगा लागून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असली तरी, घाटात मुसळधार पावसामुळे अशाच प्रकारच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही.
करुळ घाटात दरड कोसळली; वाहतूक दोन तास ठप्प….

Leave a Reply