इचलकरंजी : येथील जुना चंदुर रोड परिसरातील तणंगे मळा येथे बुधवारी रात्री ११ वाजता गवा रेडा नागरी वसाहती आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते.कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने ड्रोन सोडून गवा रेड्याचा शोध ड्रोन द्वारे घेतला शोध मात्र तो तेथून पळून गेला.
इचलकरंजीतील दुर्गा माता मंदिर, जुना चंदुर मुख्य रस्त्याला पाटील मळ्या नजीक प्रथम गवा रेडा आढळून आला.त्यानंतर,शेळके मळा, बागवान पट्टी आणि तणंगे परिसरात गवा रेडा सर्वांना आढळून आला.काही युवकांनी मोटरसायकल घेऊन त्याचा पाठलाग केला.गवा रेडा आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांना देण्यात आली.कोल्हापूर आणि हातकणंगले येथून रात्रीच वन विभागाचे पथक दाखल झाले.आपत्ती व्यस्थापन च्या गाडीची लाईट लावून ड्रोन द्वारे गवा रेड्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.मात्र गवा रेडा आल्याची माहिती मिळाल्यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.काही मंडळींनी मोबाईल द्वारे भाग्यातील लोकांना दक्षातेचा सुचना दिल्या त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही
दोन दिवसापूर्वी कोरोची येथे गवा रेडा आढळून आला होता तो हा रेडा असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
*जंगली गवा रेडा माणसाच्या शोधात*
*इचलकरंजीत आला गवा रेडा…*

Leave a Reply