नवी दिल्ली : देशातील नागरिकांना लवकरच इंधन दरवाढीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. मात्र आता या दरांमध्ये लवकरच घट होण्याचे संकेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्या पुढील दोन ते तीन महिने असाच कल राहिला, तर इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची शक्यता असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, भारत विविध देशांमधून तेलाची आयात करण्यावर भर देत आहे. यामुळे देशातील इंधन पुरवठा सुरळीत राहणार असून पेट्रोल-डिझेलच्या दरात संभाव्य घट होऊ शकते.
तेल आयात धोरणात मोठा बदल
भारताने आपले कच्च्या तेलाचे आयात धोरण बदलले असून, पूर्वी २७ देशांमधून कच्चे तेल आयात होत होते. आता ही संख्या वाढवून ४० देशांपर्यंत नेण्यात आली आहे. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
तेल बाजारपेठेतील एकूण व्यापारात भारताचा वाटा सध्या १६ टक्के आहे, जो पुढील काळात २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असेही पुरी यांनी नमूद केले.
आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच होणार स्वस्त…..

Leave a Reply