
गुरुकुल शिक्षण समूहात आज, दि. २ डिसेंबर २०२5 रोजी, वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य प्रारंभ उत्साहात झाला.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कायझेन होंडा चे श्री. रोहन बिज्जरगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी मैदानी खेळ अत्यावश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांसाठी सजग राहावे, परंतु तितक्याच निष्ठेने कर्तव्याचे पालन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावातील दत्त मंदिरातून प्रज्वलित केलेली क्रीडा ज्योत राष्ट्रीय खेळाडू धैर्यशील पवार आणि राज्यस्तरीय खेळाडू समर्थ जगताप यांनी क्रीडांगणावर आणली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्योतीचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मान्यवरांना भव्य मानवंदना दिली.
स्वागत व प्रास्ताविक नविता नायकुडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गणेश नायकुडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडांगणातील स्पर्धा विद्यार्थ्यांना आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धात्मक टप्प्यावर यशस्वी बनवते.
याप्रसंगी विशेष पाहुणे पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा मा. सौ. सुजाता पाटील, समीक्षा सचिन भोजे, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मा. सौ. बालिका पाटील व गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रेवती मगदूम तसेच दोन्ही प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि क्रीडाभावनेने यशस्वीरीत्या पार पडला.



Leave a Reply