महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा घसरत आहे. सध्या थंडीचा पारा 6 अंशाखाली गेला आहे.राज्यात हुडहुडी वाढलीये. उत्तरेकडे थंडीची लाट आली असून राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी वाढणार आहे. या थंड वातावरणात महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांचा वेग वाढला. सकाळी सर्वत्र धुके पडत आहे. राज्यात जरी थंडीची लाट असली तरीही इतर राज्यात अजूनही पावसाचे ढग अजून जोरदार पाऊस सुरू आहे. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. देशातून मॉन्सून जाऊन बरेच दिवस झालेले असताना देखील पावसाचे ढग कामय असल्याचे चित्र आहे. उत्तरेकडील थंडी सातत्याने वाढत आहे. उत्तरेकडे थंडी वाढत असल्याने राज्यातही गारठा वाढला आहे.


Leave a Reply