मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान हीने एक्सवर एक फोटो पोस्ट करत प्राडा या इटालीयन कंपनीला टोमणा हाणला आहे. मध्यंतरी प्राडा लक्झरी ब्रँडने कोल्हापूरी चप्पलची कॉपी करत आपले एक फूटवेअर फॅशन शोमध्ये प्रदर्शित केले हाते. यावेळी त्यांनी या चप्पलचे श्रेय कोणालाही दिले नव्हते यावर जगभरातून चांगलीच टीका झाली होती.

या मुद्याचा आधार घेत करीनाने एक कोल्हापूरी चप्पल घातलेला फोटो पोस्ट केला आहे. यावर तिने ‘सॉरी नॉट प्राडा… बट माय ओजी कोल्हापूरी’ (Sorry not PRADA…..but my OG kolhapuri) अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाही पण मात्र तिने परिधान कलेले स्टायलिश कोल्हापूरी चप्पल दिसतात.
Leave a Reply