रशियाचा युक्रेनवर निर्णायक हल्ल्याचा प्लॅन!

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये आता नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मागील 120 तासांत रशियाने युक्रेनवर जोरदार आणि मोठ्या प्रमाणात हल्ले चढवले आहेत. दुसरीकडे, अमेरिका मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज पाठवून युक्रेनला मदतीचा हात देत आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन नाराज असल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार, रशिया येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत युक्रेनला पूर्णपणे नियंत्रणात आणण्याची तयारी करत आहे. याशिवाय, आवश्यक असल्यास सामरिक आयुधांचा वापर करण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.