इचलकरंजी -: ‘सातत्यपूर्ण व निपुणतेच्या आधारावर, जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टांच्या जोरावर यशाचा शिखर गाठता येतो’, हे तत्व लक्षात घेत श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण शैक्षणिक वर्षभर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांची यशोगाथा कार्यक्रमातून गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष ए. आर. तांबे आणि प्राचार्य एम. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
फाऊंडेशन परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेयस जोशी, मिताली पाटील, समीक्षा पाटील, मृणाल कोकितकर, पूर्वा गांगुर्डे, मानसी साळुंखे, प्रज्ञा पाटील, नंदिनी साळुंखे, वंशिका भुजाडे, जान्हवी पाटील, साक्षी पाटील, आर्य डोळस, ईश्वरी शिंदे, दिपाली कांबळे, प्रेरणा पाटील, सार्थक पाटील, रुतुजा सपकाळ, मेघना काळा, जान्हवी भुजाडे, सृष्टी झारसे, आदिती पाटील, अथर्व पाटील, स्वस्तिक भरारी, अमिषा काळे, मानसी पाटील, जान्हवी थोरात, साक्षी कांबळे, सायली तांबे, संजीवनी कांबळे, तेजस तांबे, शुभम कांबळे इत्यादींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. शुभम शिवाजी म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमासाठी पालकांची मोठी उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले..
श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव….

Leave a Reply