इचलकरंजी : “योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यामध्ये ऊर्जा संचारते. ताणतणावाच्या या यांत्रिक जीवनशैलीत योग साधना ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात सखीसावित्री मंचच्या वतीने आयोजित ‘ज्ञानसाधनेसाठी योग’ या विशेष कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून योगशिक्षिका प्रा. वैशाली हावळे व कोमल मुसाई यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी योगशिक्षिका प्रा. हावळे यांनी “योग हा तन आणि मनाचा समन्वय साधणारा व्यायाम आहे. भारताने जगाला दिलेली ही अमूल्य देणगी आहे. योगामुळे शारीरिक लवचिकता, स्नायूंची ताकद, अभ्यासातील एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढीस लागते,” असे प्रतिपादन केले. कोमल मुसाई यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.
या कार्यक्रमाला प्रा. दिनकर पाटील, प्रा. मनीष साळुंखे, प्रा. रवींद्र पडवळे, प्रा. रॉबर्ट बारदेस्कर, प्रा. हेमांगी वडेर, प्रा. सुहास इनामदार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. सुनीता पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. श्रद्धा पाटील यांनी केले.
Leave a Reply