दुर्गापूर (पश्चिम बंगाल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सध्याच्या स्थितीवर टीका करताना टीएमसी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दुर्गापूर येथे आयोजित सभेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर महिलांवरील अत्याचार, गुंडगिरी आणि पोलिसांच्या पक्षपाती वर्तनावरून गंभीर आरोप केले.
मोदी म्हणाले, “पश्चिम बंगालमधील महिलांवर होणारे अत्याचार पाहून मला अतिशय दुःख होते आणि संतापही येतो. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले आहे.”
पुढे बोलताना त्यांनी टीएमसी सरकारच्या ‘गुंडा कर संस्कृती’वर टिका केली. “जिथे दंगली होतात, पोलिस पक्षपाती असतात, तिथे गुंतवणूकदार कसे येतील?” असा सवाल उपस्थित करत मोदींनी राज्यातील गुंतवणूकविरोधी वातावरणावरही भाष्य केलं.
मोदींनी दावा केला की पश्चिम बंगालची जनता आता परिवर्तनाची आस धरून भारतीय जनता पक्षाकडे पाहत आहे. त्यांनी स्पष्ट केलं की “विकास, स्थिरता आणि पारदर्शक प्रशासन हे केवळ भाजपच देऊ शकतो.”
सभेत त्यांनी टीएमसी सरकारच्या ‘लोकविरोधी’ धोरणांवर टीका करताना महिलांवरील अत्याचार, पोलिसांची निष्क्रियता आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालणारे वातावरण हायलाइट केलं.
या विधानांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. विशेष म्हणजे हे सर्व विधान पश्चिम बंगालमधील गुंतवणूकदारांचा अविश्वास आणि सामान्य जनतेच्या असंतोषावर भाष्य करत करण्यात आले होते.
पश्चिम बंगालमधील स्थितीवर पंतप्रधान मोदींचा कठोर हल्लाबोल: जनतेला भाजपकडून बदलाची आशा….

Leave a Reply