भारतीय युवा संघातील फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी कसोटीत अर्धशतक झळकावून आणि दोन बळी घेत जागतिक विक्रम रचण्याचा पराक्रम त्याने केला आहे.
भारताने इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४५० धावा केल्या. या डावात कर्णधार आयुष म्हात्रेने शतकी खेळी केली. त्याला साथ देताना विहान मळेहोत्रा, अभियान कुंडू, राहुल कुमार आणि आरएस अबीश्र यांनी अर्धशतकांची नोंद केली. वैभवनेही अर्धशतक झळकावले. इंग्लंडच्या अॅलेक्स ग्रीन आणि रफिए अल्बर्टने प्रत्येकी ३ बळी घेतले.
इंग्लंडचा पहिला डाव ४३१ धावांत आटोपला. रॉकी फ्लिंटॉफने सर्वाधिक १३३ धावा केल्या. भारताकडून हेनिल पटेलने ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात भारताने २४८ धावा केल्या. मळेहोत्राने सर्वाधिक ६३ धावा केल्या. एनरिच वॉनने ६ बळी घेतले. इंग्लंडला विजयासाठी ३७० धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी ७ बाद ३७० धावा करत सामना बरोबरीत राखला. कर्णधार हम्झा शेखने शतकी खेळी केली.
या सामन्याचे विशेष आकर्षण ठरला वैभव सूर्यवंशी. पहिल्या डावात त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या, पण दुसऱ्या डावात त्याने ५६ धावांची शानदार खेळी केली आणि पहिल्या डावात २ बळीही घेतले. इंग्लंडच्या खेळपट्टीवर त्याने केलेली ही कामगिरी दखलपात्र ठरली.
यापूर्वी हा विक्रम बांगलादेशच्या मेहदी हसन मिराज याच्या नावावर होता, ज्याने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १५ वर्षं १६७ दिवसांचे असताना अर्धशतक व बळी मिळवले होते. वैभवने अजून १५ वर्षं पूर्ण केलेली नसताना हा पराक्रम करून तो विक्रम मोडला आहे. भारताकडून याआधी २००२ मध्ये सुरेश रैनाने इंग्लंडविरुद्ध कोलंबो येथे १५ वर्षं व २४२ दिवसांचे असताना अर्धशतक झळकावले होते.
वैभव सूर्यवंशीने केवळ युवा कसोटीतच नव्हे, तर IPL 2025 मध्येही शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे तो आधीच चर्चेत होता. आता कसोटीत अशी ऐतिहासिक कामगिरी करून त्याने स्वतःचं नाव उज्ज्वल केलं आहे.
मुख्य मुद्दे :
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अर्धशतकासह २ विकेट्स घेत ऐतिहासिक विक्रम नोंदवला.
बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
IPL 2025 मध्ये देखील त्याची कामगिरी लक्षणीय ठरली होती.
वैभव हा अर्धशतक व विकेट्स घेणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे…
वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक विक्रम!१५ वर्षे जुना विक्रम मोडून यशाची नवी शिखरं पादाक्रांत

Leave a Reply