इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या पहिल्याच सराव सत्रात भारतीयांसाठी एक चिंताजनक घटना घडली आहे. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ आधीच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ लंडनजवळील बैकेनहॅम या ठिकाणी सराव सुरू आहे. पण या सराव सत्राच्या पहिल्याच दिवशी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि स्टार विकेटकीपर ऋषभ पंत सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
सुरुवात हलक्या सेशन्सने सुरुवात…
भारतीय संघ 6 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर 7 जून रोजी खेळाडूंनी लॉर्ड्स मैदानात हलक्या फिटनेस सेशन्सद्वारे तिथल्या हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 8 जूनपासून बैकेनहॅम या लंडनपासून सुमारे 15-16 किमी अंतरावर असलेल्या छोट्या शहरात संघाने स्किल प्रॅक्टिस सुरू केली. तिथेच टीम इंडिया 10 दिवस सराव करणार आहे.
पंतला बॅटिंगदरम्यान झाली दुखापत
रेवस्पोर्ट्जच्या वृत्तानुसार, सरावादरम्यान ऋषभ पंतला डाव्या हाताच्या कोपराजवळील भागात बॉल लागला आहे. बॉल लागल्यानंतर पंत वेदनेने विव्हळला. त्यानंतर लगेचच तो नेट्समधून बाहेर पडला. मेडिकल टीम तयार होती आणि लगेचच पंतच्या हातावर बर्फ लावण्यात आलं. त्यावर पट्टीही बांधण्यात आली. सध्या जखम गंभीर असल्याचं संकेत तरी मिळाले नाहीये.
सत्रात लयीत दिसला नाही पंत
जखम होण्याआधीच पंतच्या फलंदाजीत काहीसं उत्तम खेळत नव्हता. तो नेट्समध्ये चांगल्या लयीत दिसत नव्हता, काही वेळा तो चुकला आणि 2-3 वेळा विकेटही गमावल्या. पंतला ही दुखापत भारतीय गोलंदाजाच्या चेंडूवर झाली की थ्रोडाउन स्पेशालिस्टच्या, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सद्यस्थितीत ऋषभ पंत संघासोबतच मैदानावर उपस्थित आहे. पण तो कधी सहभागी होईल हे माहित. 18 वर्षांपासून चालू असलेली इंग्लंडमधील मालिका विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी, ही घटना नक्कीच चिंतेची बाब आहे.
Leave a Reply